
सावर्डे : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवली येथे चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सेंद्रिय शेतीचे प्रात्यक्षिक दि. 29 डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत घेण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे संकल्पनेतुन, नांदी फाऊंडेशन आणि महिंद्रा क्लासरूम यांचे संयुक्त विद्यमाने हे तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील साठ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. या प्रशिक्षण मध्ये सेंद्रिय शेतीचे महत्व, सेंद्रिय शेती करण्यासाठी लागणाऱ्या शास्त्रशुद्ध पद्धती, जिवामृत निर्मिती, गांडूळखत निर्मिती, बी.डी. काॅमपोस्ट निर्मिती अदी प्रशिक्षण देण्यात आले. कृषि क्षेत्रामध्ये रासायनिक शेती चे महत्व कमी करत सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार करणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता. प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या प्रशिक्षणास प्रशिक्षक म्हणून श्री.मयुर सावंत यांनी काम पाहीले.