
सावंतवाडी : तळवडे - खेरवाडी येथील बीएसएनएल टॉवरचे काम दिड वर्षांपूर्वी पुर्ण झाले असून सेवा सुरु केलेली नाही. त्यामुळे हा टॅावर तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी तळवडे ग्रामपंचायत सदस्य केशव परब यांनी केली.
याबाबत गेल्या दोन महिन्यापुर्वी बीएसएनएल कार्यालयात भेट देण्यात आली होती. त्या संबंधित अधिका-यांनी तात्काळ सेवा सुरु करण्याची हमी दिली होती. परंतु आजपर्यंत सेवा सुरु केलेली नाही. त्यामुळे तात्काळ टॉवरची सेवा सुरु करण्यात यावी, ही सेवा तात्काळ सुरु न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल असा इशारा दिला आहे. यावेळी मंगलदास पेडणेकर,सुरेश मांजरेकर,सौ.स्मिता परब,सौ.नम्रता गावडे आदी उपस्थित होते.