
सावंतवाडी : सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार सोसायटीचे कर्ज पुर्ण भरणा केल्यानंतरच कर्ज नुतनीकरण करण्यात यावे असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शेतक-यांना खरीप हंगामात शेती, बागायती, खते, बी-बीयाणे, औजारे व इतर शेती साधने खरेदी करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. या अनुषंगाने एका लेखी निवेदनाव्दारे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधण्यात आले. तातडीने दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. ना. श्री. अतुल सावे यांना लेखी पत्र देवून सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देवून विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज पुनर्गठन करण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती केली आहे.
या निवेदनांवर शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, उपजिल्हा प्रमुख सुनिल मोरजकर, राजू मुळीक, सरपंच योगेश तेली आदी कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले आहे.