
सावंतवाडी : गांजा प्रकरणातील आरोपींना जेरबंद करून सावंतवाडी पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यासाठी पोलिसांचे अभिनंदन. परंतू, या प्रकरणात नेमका सूत्रधार कोण ? याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी केली.
युवा पिढीला बरबाद होण्यापासून वाचवावे. अन्यथा, याचा फटका भविष्यात तरूणाईला बसण्याची शक्यता आहे. गेले अनेक दिवस जिल्ह्यात अंमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याबाबत पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालून या प्रकाराच्या मागे नेमका कोण ? याची सखोल चौकशी करावी असेही चंद्रकांत कासारं यांनी म्हटले आहे.