संपुर्ण वैभववाडी शहर सीसीटिव्हीच्या कक्षेत आणण्याची मागणी..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 18, 2023 20:07 PM
views 172  views

वैभववाडी : शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. चोऱ्यांच्या या प्रकारांना आळा बसावा यासाठी संपुर्ण शहर सीसीटिव्हीच्या कक्षेत आणावे.जागोजागी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी अशी मागणी प्रभाग १३ मधील नागरिकांनी आज (ता.१८) नगरपंचायतीकडे केली.

प्रभाग क्रमांकमधील भानुदास तावडे यांच्या हॉटेलमधील टिव्हीची चोरी दोन तीन दिवसांपुर्वी झाली होती.या चोरीच्या तपासाकरीता आणलेले श्वान प्रभाग बारामधील तिठ्यापर्यत येऊन घुटमळले.त्या अनुषंगाने आज प्रभाग १३ मधील नागरिकांनी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संजय सावंत यांची भेट घेतली.यावेळी नागरिकांनी शहरात परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात आहेत.

त्यांच्यावर कुणाचेही नियत्रंण नाही.अशा व्यक्तींकडुन चोऱ्या,फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत.या चोऱ्यांना आळा बसावा याकरीता शहरात सीसीटिव्ही बसविण्यात यावेत,स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी,शहरात गस्त वाढविण्यासाठी पोलीसांकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन वेळीच उपाययोजना कराव्या अशा आशयाचे निवेदन नगरपंचायतीला देण्यात आले.यावेळी श्री.तावडे,नगरसेवक मनोज सावंत,बंडु गाड,शिवाजी राणे,संतोष कुडाळकर,गणेश पाटील आदी उपस्थित होते.