स्वच्छतागृहासाठी शुल्क न आकारण्याची मागणी

Edited by: विनायक गावस
Published on: October 04, 2023 13:26 PM
views 134  views

सावंतवाडी : इंदिरा गांधी व्यापारी संकुलमधील स्वच्छतागृह गेल्या अनेक दिवसांपासून वापरास बंद आहे. त्यामुळे येथील व्यापारी वर्गाला नाथ पै सभागृहाशेजारील स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत होता. या ठिकाणी न.प. प्रशासनाकडून शुल्क आकारला जात होता. यासंबंधी आज माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक व सुधीर आडीवरेकर व नगरसेवक उदय नाईक, नासिर शेख यांनी नगरपरिषद प्रशासनाच लक्ष वेधलं. 

इंदिरा व्यापारी संकुलात असणार हे स्वच्छतागृह बाजारपेठेत येत होतं. ते सध्या वापरात नसल्यानं व्यापारी वर्गासह बाजारात येणाऱ्या लोकांना पर्यायी स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत होता. वरील मजल्यावर असलेल्या नाथ पै सभागृहाशेजारील स्वच्छतागृहाचा वापर केला जात होता. मात्र, त्या ठिकाणी प्रशासनाकडून शुल्क आकारला जात होता. यातच गाडगेबाबा मंडईतील व्यापारी वर्गाच स्थलांतर याठिकाणी करण्यात आलं. दरम्यान, याबाबत माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक व सुधीर आडीवरेकर यांनी नगरपरिषद प्रशासनाच लक्ष वेधल. न.प.च्या अधिकारी आसावरी शिरोडकर यांना याबाबत निवेदन देत शुल्क न आकारण्याची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाकडून हा शुल्क आकारला जाणार नसून केवळ शौचालयाच्या वापरासाठी शुल्क आकारला जाणार आहे. याबाबतच आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. याप्रसंगी माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, नासिर शेख, आरोग्य विभागाच्या रसिका नाडकर्णी आदी उपस्थित होते.