
सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे सहकारी कौल उत्पादक संस्थेला विशेष खासबाब म्हणून दोन कोटी रुपये शासकीय भाग भांडवल देऊन आर्थिक सहकार्य करा अशी मागणी संस्थेच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष आत्माराम राऊळ यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याजवळ केली आहे.
संस्थेच्या माध्यमातून संचालक मंडळामार्फत श्री. राऊळ यांनी पालकमंत्री राणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नेमळे येथील कॉल उत्पादक संस्था ही सहकारी तत्त्वावर चालणारी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक सहकारी संस्था आहे. 1963 साली अधिकृत रित्या मान्यता मिळवून ही संस्था सुरू करण्यात आली आहे या संस्थेच्या माध्यमातून बांधकामासाठी लागणाऱ्या विटा,मंगलौरी कौले, कांच कौले, हुंड्या यांचे उत्पादन घेण्यात येते संस्थेच्या माध्यमातून काम करणारे कामगार हे बांधकाम व्यवसायाखाली काम करणाऱ्या प्रकारांमध्ये मोडतात सद्यस्थितीत संस्था आर्थिक तोट्यात सापडली आहे. यामागचे कारण म्हणजे कोरोना काळामध्ये लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत 2000 सालात मार्च ते जून या चार महिन्याच्या कालावधीत कोरोना प्रतिबंधक आदेशानुसार संस्थेचे युनिट बंद ठेवणे संस्थेला भाग पडले या चार महिन्यात कुठल्याही प्रकारचे उत्पादन घेण्यात आले नाही शिवाय जुलै ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाळी हंगाम असल्याने युनिट मशिनरी व भट्टी दुरुस्तीसाठी बंद असते एकूणच आठ महिने कौल कारखान्यातून काहीच उत्पादन घेण्यात आले नाही, मात्र असे असले तरी संस्थेमध्ये काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांना पगार देणे संस्थेला भाग पडले त्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत येऊन तोट्यात सापडली आहे जवळपास सद्यस्थितीत 75 लाखापेक्षा मोठे कर्ज संस्थेवर असून शासनाच्या हरित लवाद कायद्या धोरणानुसार कच्चामाल माती तसेच जळावू लाकूड यांची वेळोवेळी उपलब्धता होत नसल्याने उत्पादनातही घडवून संस्थेला आर्थिक भार सोसावा लागत आहे. सद्यस्थितीत 100 कामगार व 10 कर्मचारी यांना रोजी रोटी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उत्पादन वाढवून तोटा भरून काढण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे यासाठी शासनाकडून विशेष खास बाब म्हणून दोन कोटी शासकीय भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात यावे असे म्हटले आहे.
संस्थेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या निवेदनानंतर पालकमंत्री राणे यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन यावेळी संचालक मंडळ तसेच अध्यक्ष श्री राऊळ यांना दिले.