
देवगड : देवगड तालुका भौगोलिकदृष्ट्या दोन भागात विस्तारलेला आहे. एक देवगडचा खाडीअलीकडील भाग व दुसरा खाडीपलीकडील विजयदुर्ग भाग. शेतकरीवर्ग व व्यावसायिक यांचा बॅंकींग सेवांसाठी कल हा नेहमीच स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहे, विजयदुर्ग भागात दाटीवाटीची लोकसंख्या, पडेल कॅन्टीनच्या सभोवताली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची एक शाखा तिर्लोट गावात आहे. हे गाव मध्यवस्तीपासून बारा किलोमीटर दुर आहे. व तिर्लोटला जाण्यायेण्यासाठी वाहतुक व्यवस्था अत्यल्प प्रमाणात आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा पडेल कॅन्टीन येधे व्हावी याविषयीचा प्रस्ताव, पडेल सरपंच भूषण पोकळे, रहिवाशी व व्यावसायिक .बाळा साळवी,पडेल विभागातील महिला व्यावसायिक प्रिती देवधर यांचेसोबत,भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.भाई बांदकर यांनी,स्टेट बँक ऑफ इंडिया, देवगड शाखेचे ब्रॅच मॅनेजर बागवे याना सुपूर्द केला.यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियातील निवृत्त अधिकारी. चारुदत्त सोमण हे देखील उपस्थित होते.
विजयदुर्ग विभागात शेतकरी, चिरे खाण व्यावसायिक, शिक्षकवर्ग व आंबा बागायतदार यांची संख्या जास्त असल्यामुळे, त्यांचे बॅंकीग व्यवहार दररोजचे आहेत व त्यांना सध्याच्या तिर्लोट शाखेत किंवा देवगड शहर शाखेत जाणे गैरसोईचे व खर्चाचे ठरते, म्हणुन पडेल कॅन्टीन येथे बँकेची शाखा असणे अत्यंत आवश्यक व गरजेची आहे. ही शाखा पडेल कॅन्टीनला व्हावी याच्या समर्थनार्थ विद्यमान आमदार नितेश राणे, माजी आमदार ॲड. अजित गोगटे व विजयदुर्ग पंचक्रोशीतील सर्वग्रामपंचायतीनी या बाबत पत्रे दिली आहेत. देवगडच्या विकासात या बँकेच्या पडेल विभागातील शाखेमुळे नागरिकांची होणारी गैरसोय टळेल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.