नेमळे हायस्कूल समोर स्पीडब्रेकर

संदीप गावडेंनी घेतला पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: March 12, 2026 17:39 PM
views 69  views

सावंतवाडी : नेमळे हायस्कूल समोरील महामार्गावरून अनेक अवजड वाहने तसेच इतर वाहनांची वरदळ सुरू असते विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावर स्पिडब्रेकर असणे आवश्यक आहे अशी मागणी शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ यांच्यामध्यामातून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. 

ही मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद सदस्य संदिप गावडे यांच्या माध्यमातून  या महामार्गावर स्पिडब्रेकर बसविण्यात आले आहेत. या उपक्रमाकरिता पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक तसेच भारतीय जनता पार्टी नेमळे यांनी देखील विशेष पुढाकार घेतला. या सुप्त उपक्रमाबद्दल प्रशालेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून संदिप गावडे तसेच गौरव मुळीक व भाजपा नेमळे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.