संत सोहिरोबोनाथांचे तैलचित्र बांदा ग्रामपंचायतील लावण्याची मागणी

Edited by: संदीप देसाई
Published on: April 22, 2024 13:26 PM
views 81  views

बांदा :  बांद्याच्या पुण्य भूमीत जन्म घेतलेले व 'हरी भजनावीण काळ घालवू नको रे' असा संदेश देणारे संत श्री सोहिरोबोनाथ आंबीये यांचे तैलचित्र बांदा ग्रामपंचायत कार्यालयात लावावे अशी मागणी समस्त भक्तांच्या वतीने करण्यात आली आहे. नुकतेच हे तैलचित्र श्वेता कोरगावकर, गुरु कल्याणकर व आशुतोष भांगले यांनी सरपंच प्रियांका नाईक यांच्याकडे सुपूर्द केले.

संत सोहिरोबोनाथ आंबीये यांनी या भूमीत जन्म घेतला असून त्यांनी या भागातील जनतेचा भक्तीचा मार्ग दाखविला. हे बांदावासियांसाठी अभिमानास्पद आहे. आंबीये महाराज यांचे कार्य व अभंग वारकरी व संत संप्रदायात महत्वाचे असून त्यांचे अभंग आजही महाराष्ट्र, गोवा राज्यात व देशाच्या कानकोपऱ्यात अस्तित्वाची आठवण करून देतात. यासाठी त्यांनी केलेल्या समाजसेवच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचे तैलचित्र ग्रामपंचायत लावावे यासाठी भक्त गणांकडून तैलचित्र कार्यालयास भेट देण्यात आले.

यावेळी सरपंच प्रियांका नाईक व ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये उपस्थित होत्या. महाराजांचे तैलचित्र सभागृहात लावण्याचे आश्वासन सरपंच नाईक यांनी यावेळी दिले.