सावंतवाडी रेल्वे स्थानकात महत्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याबरोबरच टर्मिनसचे काम पूर्ण करण्याची मागणी..!

कोकण रेल्वे प्रवासी सेवा (रजि) संघटनेचे मुख्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांना निवेदन
Edited by: विनायक गावस
Published on: July 26, 2023 20:16 PM
views 472  views

सावंतवाडी : गेली अनेक वर्षे रेंगाळलेले सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण करून त्याचे "प्राध्यापक मधू दंडवते टर्मिनस" असे नामकरण करावे आणि महत्वाचा अशा रेल्वे गाड्यांना येथे थांबा द्यावा असे निवेदन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजिस्टर) यांनी मुख्यमंत्री, रेल्वे मंत्री आणि खासदारांना दिले.

कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते ठोकूर असा कोकण रेल्वे मार्ग असला तरी महाशय कोकण रेल्वे प्रवासी यांचा रेल्वे प्रवास वा कोकणवासियांच्या तळ कोकणातील अत्यंत अतिमहत्वाचे स्थानक *"सावंतवाडी रोड"* होय. कालांतराने आता सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक असे नावारूपास आले. कोकणवासियांच्या महत्त्वाच्या मेल/ एक्सप्रेस मधील जनशताब्दि एक्स., मांडवी एक्स., कोकणकन्या एक्स,. या गाड्यांव्यतिरिक्त तुतारी एक्स. व दिवा एक्स. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात दैनंदिन प्रकारात आग कोकणवासियांना या एक्सप्रेस गाड्यांचा बराच मोठा फायदा तर होतोच आहे; परंतु दैनंदिन गाड्यांच्या तुलनेत आणि सावंतवाडी हे तळकोकण चे रेल्वे स्थानक असल्यामुळे खालील काही मुद्दे मांडत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकासाठी अधिक थांब्यासाठी काही गाड्यांची मागणी करीत आहोत असे राजू कांबळे यांनी सांगितले.सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास टर्मिनल्स चा दर्जा मिळावा यासाठी पूरेपूर यशस्वी प्रयत्नशील राहत कार्य सिद्धीस करावे.सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास कोकण रेल्वे मार्गाचे शिल्पकार आदरणीय प्रा. मधू दंडवते साहेब यांचे नाव देवून *प्रा. मधू दंडवते टर्मिनल्स* असे नामकरण करण्यात यावे.

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट विक्री खिडकी सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात यावी.गाडी क्र.१२६१८/१२६१७ मंगला लक्षद्विप एक्सप्रेस, निजामउद्दीम-एर्नाकूलम/ एर्नाकूलम-निजामउद्दीम. या दैनंदिन गाड्यंस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा.गाडी क्र. १६३४५/१६३४६ नेत्रावती एक्सप्रेस, लो. टिळक टर्मि.-तिरूवअनंतपूरम/तिरूवअनंतपूरम-लो. टिळक टर्मि. या दैनंदिन गाड्यांस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा. गाडी क्र. १२६१९/१२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस, लो. टिळक टर्मि.-मेंगलोर सेन्ट्रल/मेंगलोर सेंट्रल-लो. टिळक टर्मि., या गाड्यांसही सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा. गाडी क्र. ०११३९/०११४० नागपूर-मडगांव विशेष/मडगांव-नागपूर विशेष गाडीस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.गाडी क्र. २२२२९/२२२३० वन्दे भारत एक्सप्रेस, मुंबई-मडगांव/मडगांव- मुंबई या वातानुकूलित गाडीस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मोठ्या प्रमाणात मागणी करीत आहोत असे संघटनेचे पदाधिकारी श्री राजू कांबळे यांनी सांगितले.