सोशल मिडीयावर बदनामीकारक स्टेटस ; भाजप - ठाकरे गटात शाब्दिक बाचाबाची !

Edited by: भरत केसरकर
Published on: April 25, 2024 05:19 AM
views 319  views

कुडाळ : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना ठाकरे गट या राजकीय पक्षांच्या उमेदवाराविरोधात सोशल मीडियावरील आक्षेपार्य बदनामीकारक मजकुरामुळे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुडाळ पोलीस ठाणे येथे शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार बुधवारी घडला. काहीसे तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असताना पोलिसांनी घेतलेल्या भूमीकेमुळे हा वाद शांत झाला. पोलिसांनी अखेर दोन्ही बाजूकडील तक्रारची दखल घेत दोन्ही गटातील आक्षेपार्ह मजकूर शेअर करणाऱ्या या दोन्ही कार्यकर्त्यावर कारवाई सुरू केली. दरम्यान दोन्ही बाजूकडून आलेल्या तक्रार नुसार आक्षेप मजकूर शेअर करणाऱ्या त्या दोन्ही कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कुडाळचे पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी सांगितले.

    लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत घटना घडल्याने शहरात त्यावर चर्चा रंगली होती. भाजपच्या नेत्याविरोधात एका अल्पवयीन मुलाने व्हाॅट्सअॅपवर बदनामकारक स्टेटस ठेवला होता. त्याला संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घातला. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्ते काही वेळात पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी दोन राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण काहीसे तापले.

     कुडाळ पोलीस ठाणे येथे समोरासमोर झालेल्या या दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाल्याने वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र दोन्ही राजकीय पक्षाने एकमेकाविरोधात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराची दखल पोलिसांनी घ्यावी अशी मागणी केली. याबाबत एका पक्षाच्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर ठेवल्यची  तक्रार कार्यकर्त्याकडून पोलीस ठाण्यात दाखल होत असल्याचे समजतात समोरच्या पक्षाचे कार्यकर्त्यांनी आपला नेता तथा उमेदवाराविरोधात काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या आक्षेपार्ह मजकूराचा विषय समोर आणत याबाबतची तक्रार घ्यावी.अशी मागणी करीत त्याने तक्रार दिली. अखेर दोन्ही पक्षाच्या स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्याप्रकरणी दोन्ही पक्षाच्या या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याची माहिती ऋणाल मुल्लांनी दिली आहे.