
देवगड : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघा च्या माध्यमातून विजयदुर्ग येथील श्री वाळकेश्वर मंदिरात, दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरामाराची स्थापना केली, या आरमार दिवसाचे औचित्य साधून, विजयदुर्ग येथील श्री वाळकेश्वर मंदिरात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने, मान्यवरांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात दिव्यांची आरास आणि सुबक अश्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे सदस्य,यावेळी पदाधिकारीही या उत्सवात सहभागी झाले होते.