जनता तुम्हाला भिक घालणार नाही ; केसरकर समर्थकांचा ठाकरे सेना, राष्ट्रवादीला पलटवार

Edited by: विनायक गांवस
Published on: March 14, 2023 17:17 PM
views 131  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे गर्भश्रीमंत आहेत. त्यांची प्रॉपर्टी कशी वाढली हा प्रश्न रूपेश राऊळ तुम्ही विचारू नका. भाड्याच्या घरात राहाणारे तुम्ही फ्लॅट कसा घेतलात हे सांगा. केसरकरांवर आरोप केलात तरी जनता तुमच्या आरोपांना भिक घालणार नाही. यापुढे केसरकरांवर बोलताना तोंड सांभाळून बोला, अन्यथा तुमची जंत्री उघड केली जाईल अस प्रत्युतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो यांनी दिल.


उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाप्रमुख पुंडलिक दळवी यांनी केसरकर यांच्यावर टीका करताना भान ठेवावं. रुपेश राऊळ हे गेली कित्येक वर्षे पदाला चिकटून आहेत. केसरकर यांच्या नावाखाली टक्केवारी खायच काम ते करत होते. आता टक्केवारी बंद झाल्यानं ते बिथरले आहेत. ठेकेदारांना बाजूला घेऊन कामाच्या टक्केवारीचे पैसे घ्यायचे आणि नंतर कामे द्यायची हाच त्यांचा व्यवहार होता. या मार्चमध्ये ते डीम पडले अशी टीका तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी केली. 


दीपक केसरकर यांनी आपली बेळगावची प्रॉपर्टी विकून पक्षासाठी निधी दिला होता. पक्षासाठी पैसे दिले होते, हे सत्य आहे. कोट्यवधीचा निधी या भागासाठी केसरकर यांनी आणला.शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे गर्भश्रीमंत आहेत. त्यांची प्रॉपर्टी कशी वाढली हा प्रश्न रूपेश राऊळ तुम्ही विचारू नका. भाड्याच्या घरात राहाणारे तुम्ही फ्लॅट कसा घेतलात हे सांगा. तर राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी आदी लोक विकासकामांसाठी दीपक केसरकर यांच्याकडे येतात काम घेऊन जातात आणि त्यांच्यावरच बोलतात असा टोला राष्ट्रवादीवाला हाणला. तर अर्चना घारे या पुण्याच्या आहेत. राष्ट्रवादीत स्थानिक कुणी महिला नाहीत का ? असा सवाल त्यांनी केला. यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत - कविटकर, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, महिला शहरप्रमुख भारती मोरे, मंगलदास देसाई आदि उपस्थित होते.