शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर

Edited by: विनायक गांवस
Published on: March 10, 2023 22:45 PM
views 158  views

सिंधुदुर्गनगरी : शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 11 व 12 मार्च 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  शनिवार, दि. 11 मार्च 2023 रोजी रात्रौ 12.40 वाजता दाबोलीम विमानतळ, गोवा येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, सावंतावाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता शिवसेना पदाधिकरी मेळावा. स्थळ रविंद्र मंगल कार्यालय, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग. दुपारी 1.15 वाजता कोकणचे सीईओ-करीअर मार्गदर्शन कार्यक्रम (PNNSS CAREER PROF PVT.LTD) स्थळ: महालक्ष्मी हॉल. कुडाळ जि. सिंधुदुर्ग. दुपारी 1.45 वाजता कुडाळ शिवसेना शाखेला भेट. स्थळ: कुडाळ जि. सिंधुदुर्ग. दुपारी 3 वाजता शिवसेना पदाधिकारी मेळावा. स्थळ: मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली जि. सिंधुदुर्ग. सायंकाळी 5 वाजता शिधुरत्न समृध्द योजना मुख्यालय उद्घाटन समारंभ. स्थळ: सिंधुरत्न समृध्द योजना मुख्यालय, 2 रा मजला बैठक हॉलसमोर जिल्हाधिकारी कार्यालय, जि. सिंधुदुर्ग. सायंकाळी 5.15 वाजता सिंधुरत्न समृध्द योजना सन 2022-23 अंतर्गत आढावा बैठक. स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस जि. सिंधुदुर्ग. सायंकाळी 7 वाजता ग्यारवाँ वर्धापन दिन (कोकण विभाग). स्थळ: हॉटेल आराध्य, मुंबई-गोवा हायवे, भोम, जि. सिंधुदुर्ग. सोईनुसार हॉटेल आराध्य, भोम येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे आगमन व राखीव. रविवार दिनांक. 12 मार्च 2023 रोजी सकाळी 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथून मोटारीने बार्देश,गोव्याकडे प्रयाण.