
सिंधुदुर्ग : खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्गनगरी पार पडतोय. अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी नारायण राणे यांचा खास सन्मान आमदार दीपक केसरकर यांनी केला. शाल श्रीफळ देत त्यांचा सन्मान झाला. चांदीची गणपतीची मूर्तीहि त्यांनी खास भेट दिली.
राणे साहेब बरोबर असतील तर 2 वर्षांनंतरचा सिंधुदुर्ग वेगळा असेल. तुमचं पर्यटनाचं स्वप्न साकार करायचं. खासदार आमदार एका मताचे आहेत सिंधुदुर्ग आता कधीही मागे पडणार नाही. तुमच्या नेतृत्वाखाली काम करत राहू. महायुती सिंधुदुर्गचा कायापालट करेल. आपल्याकडून सिंधुदुर्ग - महाराष्ट्राची सेवा घडत राहो, अशा शुभेच्छा आमदार दीपक केसरकर यांनी दिल्यात.