मशाल मुंबईला पाठवणार : दीपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 24, 2024 16:15 PM
views 262  views

सावंतवाडी : शहर,गाव आणि मंदिर परिसरात भरपूर वीजेची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे मशालीची गरज नाही. मशाल मुंबईला परत पाठविणार असल्याचे विधान शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी केले.

केसरकर म्हणाले, आमच्या शहर, गाव मंदिराकडे भरपूर लाईट आहेत. सर्व ठिकाणी हायमास्ट उभे केलेत. इकडे मशालीची गरज नाही. त्यामुळे त्यांनी मुंबईत परत जावे तसेच सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मी आणि उद्योग मंत्री उदय सामंत सक्षम आहोत. मागील अडीच वर्षात प्रती मुख्यमंत्री होऊन खासदार विनायक राऊत यांनी काय दिवे लावले ते जनतेला माहित आहेत. मात्र, आम्ही विनायक राऊत यांना निवृत्तीनंतर त्यांनी केले तसे करणार नाही त्यांनी आमच्याकडे जरूर काम घेऊन यावे आम्ही त्यांची कामे करू तिथे आम्ही पक्षभेद मांडणार नाही असा टोलाही केसरकर यांनी राऊत यांच्यावर हाणला.