सावंतवाडी : विधानसभा निवडणूकीसाठी काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार फेऱ्यांनी वेग घेतला आहे. सावंतवाडी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी मैदानात उतरत केसरकर यांना विजयी करा असे आवाहन केले आहे. शहरातील बाजारपेठेत दुकाने, घरोघरी प्रचार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी दीपक केसरकर मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठेत दुकाने, घरोघरी जात प्रचार केला. धनुष्यबाण हे बटन दाबून केसरकर यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. मतदारांमधूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. मंत्री दिपक केसरकर यांच्याकडून या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. महायुती त्यांच्या सोबत असल्याने ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केला. मिलाग्रीस हायस्कूल पासून या प्रचाराला सुरुवात करण्यात आली. बाजारपेठ याचा समारोप झाला.
यावेळी युवराज लखमराजे भोंसले, अँड. संजू शिरोडकर, देव्या सुर्याजी, परिक्षीत मांजरेकर, सुरेंद्र बांदेकर, अँड. निता कविटकर, किर्ती बोंद्रे, किरण नाटेकर, वर्धन पोकळे, प्रतिक बांदेकर, प्रथमेश प्रभू, पांडुरंग वर्दम, देवेश पडते, मंथन जाधव, साई म्हापसेकर, निखील सावंत, संकल्प धारगळकर, श्री. सावंत, ओंकार सावंत, साईश वाडकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते युवा सैनिक उपस्थित होते.