दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत केसरकर दाखल करणार उमेदवारी अर्ज

Edited by:
Published on: October 28, 2024 14:34 PM
views 223  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना - भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार दीपक केसरकर हे उद्या मंगळवार २९ ऑक्टोबर २०२४ रोजी खासदार नारायण राणे साहेब, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद  नाईक यांच्या व महायुतीच्या इतर नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी मिलाग्रिस हायस्कुल येथून महायुतीची भव्य रॅली निघणार असून  यानंतर गांधीचौक येथे दिपक केसरकर कार्यकर्त्याना संबोधित करणार आहेत व यानंतर येथील उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) यांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केले आहे.