
दोडामार्ग : येत्या सहा महिन्याच्या आता आडाळी एमआयडीसी 2 ते 3 कारखाने आणून भूमिपूजन करून इथल्या युवक युवतीना रोजगार मिळवून देणार. दीपक केसरकरांनी दोन वेळा भूमिपूजन केलेल्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे सर्वाना विश्वासात घेऊन भूमिपूजन करून अध्यक्ष कामाला सुरुवात करणारच असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी व्यक्त केला.
दोडामार्ग येथील विलास हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माझी राज्यमंत्री प्रवीण भोसले, दोडामार्गचे लोकनेते सुरेश दळवी, उबाठाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, उबाठा तालुकाप्रमुख संजय गवस, राष्ट्रवादी प्रभारी तालुका प्रमुख विलास सावळ, सुभाश दळवी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आधी उपस्थित होते. काहीतरी बोलताना पुढे म्हणाले की इथल्या तरुण-तरुणींना रोजगार देणं ही काळाची गरज आहे. 2013 मध्ये सुरू झालेल्या आडाळी एमआयडीसी जैसे येथेच स्वरूपात असून दीपक केसरकरच आहेत. अडाणी एमआयडीसीच्या कृती समितीने लॉंग मार्च सारखे आंदोलन केले आम्ही सर्व पक्षीय सहभागी झालो. आणि कुठेतरी आडाळी एमआयडीसीतील भूखंड वितरण केले गेले लाईट पेटली. त्यावेळी आम्ही वारंवार इथले उद्योग मंत्री उदय सामंत तसेच स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना वारंवार गोव्यामध्ये उद्योग परिषद घ्या असे सांगूनही त्यांनी उद्योग परिषद घेतली नाही. दुसरा आरोग्याचा प्रश्न घेतला तर सर्वप्रथम मी गोवा सरकारचे धन्यवाद मानतो की त्यांनी आमच्या सिंधुदुर्गातील रुग्णांवर वेळोवेळी उपचार करून आम्हाला सहकार्य केले. मागितले आमदार, मंत्री साधे आरोग्याचे प्रश्न सोडवू शकत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. सावंतवाडी येथे होऊ घातलेल्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल चे भूमिपूजन स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी दोन वेळा केले मात्र कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही.तसेच बागायतदार शेतकरी यांना आपल्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. या सर्व विषयांकडे पाहता इथले स्थानिक पदाधिकारी वरिष्ठ नेतेमंडळी या सर्वांना विश्वासात घेऊन शेतकरी बागायतदार आरोग्य सर्व विषयांकडे गांभीर्याने लक्ष देणार असे तेली म्हणाले.
बंडखोरांवर कारवाई करणार : माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले
महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीचा उमेदवार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंडखोरी केलेल्या अर्चना घारे परब त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोडामार्ग मधील तालुकाप्रमुख प्रदीप चांदलकर सुदेश तुळसकर संदीप गवस यांसारखे पदाधिकारी अर्चना घारे यांच्या बाजूने गेले. या सर्व पदाधिकाऱ्यांवर
निलंबनाची कारवाई होणार असे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी प्रभारी म्हणून विलास सावळे यांची नव्याने नेमणूक करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
जीवाच रान करून तेलींना निवडून द्या : लोकनेते सुरेश दळवी
राजन तेली गेली अनेक वर्षे राजकारणात आहे त्यांना राजकारणाचा गाढा अभ्यास आहे. याच्यापूर्वी ते आमदार व्हायला पाहिजे होते पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही. मात्र यावेळी सर्व वरिष्ठांचा त्यांना पाठिंबा आहे. म्हणून प्रत्येकाने हातात हात घालून कामाला लागा सत्ता आपलीच येणार आहे हे निश्चित आहे. तळागाळात प्रसार प्रचार करा हाय काय करू नको जीवाचे रान करून राजन तेली यांना निवडून द्या मी त्यांना शुभेच्छा देतो असे वक्तव्य यावेळी सुरेश दळवी यांनी केले.