...म्हणून केसरकरांनी पकडले राणेंचे पाय : प्रवीण भोसले

Edited by: विनायक गांवस
Published on: April 27, 2024 05:21 AM
views 285  views

सावंतवाडी : दीपक केसरकर  पंधरा वर्षे मतदारसंघाचा विकास करायला कमी पडले. त्यामुळे त्यांना आता नारायण राणेंची पाय धरणाची वेळ आली अशी टीका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केली‌‌. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी तालुक्यातील बैठकीत ते बोलत होते.

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली सावंतवाडी पंचायत समिती मतदारसंघात महायुतीच्या बैठका घेतल्या जात आहेत. कलंबिस्त, करिवडे, आरोंदा, साटेली, माडखोल आदी ठिकाणी या बैठका पार पडल्या. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले,  भाजप सरकार हे खोटी आश्वासने व फसव्या योजना राबवून जनतेची दिशाभूल करत असल्यान निवडणुकीत त्यांना जनतेने योग्य दाखला दाखवावी अस आवाहन केलं. तर ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी खासदार विनायक राऊत हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. त्यांना कोणती व्यक्ती जाऊन भेटू शकते. मात्र, नारायण राणेंच तसं नाही. त्यांना भेटण्यासाठी अधीमधी माणस लागतात. त्यामुळे खासदार हा सर्वसामान्यांचा असला पाहिजे, ज्याला जनता कधीही भेटू शकते अशा टीका केली. कॉग्रेस नेते, विकास सावंत यांनी कोरोनाच्या काळात दीपक केसरकर सर्वसामान्यांमध्ये होते का? तसेच आजपर्यंत दीपक केसरकारांनी वेळोवेळी आपल्या सोयीच राजकारण केला आहे असं विधान केलं.

जान्हवी सावंत यांनी या देशात लोकशाही, संविधान न्यायव्यवस्था वाचली पाहिजे त्यामुळे अशा तऱ्हेची देशातली हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी विनायक राऊत आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिला पाहिजे अस आवाहन केलं. तर अँड. दिलीप नार्वेकर यांनी गद्दारांना धडा शिकवला पाहिजे आज महाराष्ट्राची लोकशाहीला काळीमा फासण्याचा काम या गद्दाऱ्यांनी केलं आहे असा हल्लाबोल केला.

याप्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळी विकास सावंत, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय  पडते, उपनेते जान्हवी सावंत, विधानसभा संपर्क शैलेश परब, अँड. दिलीप नार्वेकर साक्षी वंजारी, चंद्रकांत गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसूजा, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर, समीर वंजारी, रश्मी माळवदे, कल्पना शिंदे आदि उपस्थित होते ‌