दीपक केसरकरांनी कोणती प्रॉपर्टी विकली ?

जाहीर करण्याचं प्रवीण भोसले यांचं आव्हान
Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2024 08:08 AM
views 668  views

सावंतवाडी : दीपक केसरकर यांनी कोणती प्रॉपर्टी विकली ? हे  जाहीर करावं असं आव्हान माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिलंय. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, दीपक केसरकर यांनी आमदार झाल्यानंतर घेतलेली प्रॉपर्टी विकली का ? ते जाहीर करावं. त्यांनी निवडूकीवेळी दाखवलेली प्रॉपर्टी ही वडीलोपार्जित दाखवलेली आहे. याबाबत कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आलेली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री केसरकर यांनी विकत घेतलेली प्रॉपर्टी त्यांनी दाखवलेली नाही. त्यामुळे त्यांनी कोणती प्रॉपर्टी विकली ? वडीलोपार्जित की लोकप्रतिनिधी झाल्यानंतर घेतलेली ते जाहीर करावं अस आव्हान माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिलंय.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब,  तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, प्रसाद रेगे, भास्कर परब आदी उपस्थित होते.