विरोधकांच्या तोंडावर जाहीरनामा फेकून मारा !

केसरकरांनी काय केलंय ते दाखवा ; शितल म्हात्रेंचे विरोधकांवर बाण
Edited by: विनायक गांवस
Published on: November 17, 2024 20:34 PM
views 176  views

सावंतवाडी : दीपक केसरकर यांनी मुंबईचे पालकमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, मराठी भाषा मंत्री म्हणून मोठं काम राज्यात केलं आहे. सावंतवाडी मतदारसंघाचा आमदार म्हणून सर्वाधिक विकासकामे त्यांनी केली‌. त्यांचा जाहीरनामा वाचायला पाच वर्षे लागतील. मात्र, काही लोक विचारतात केसरकरांनी काय केलं ? त्या विरोधकांच्या तोंडावर हा जाहीरनामा फेकून मारा अन् त्यांना दाखवा दीपक केसरकर यांनी किती कोटींची कामे केलीत असे विधान शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे त्या बोलत होत्या.

सौ. म्हात्रे म्हणाल्या, बोलणारे बोलत राहतील. केसरकर काम करणारे मंत्री आहेत. एकनाथ शिंदेंना गरज असताना मोलाची साथ दीपक केसरकर यांनी दिली. आपल्या ही जागा जिंकून आणायची आहे. समोर कोणीही असू देत आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणी आहोत. कोणाला घाबरायची गरज नाही. लाडक्या भावाला राज्याचा कायापालट करण्यासाठी पुढची पाच वर्षे दिली पाहिजे. दीपक केसरकर यांचा विजय निश्चित आहे. ते किती मतांनी विजयी होणार हा प्रश्न आहे. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी शिवधनुष्याला साथ द्या, राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे असं मत शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनी व्यक्त केले. यावेळी सौ. वृषाली श्रीकांत शिंदे, शिवसेना नेत्या शितल म्हात्रे, माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, सौ. सोनाली केसरकर-वगळ, महिला जिल्हाप्रमुख अँड निता सावंत कविटकर, माजी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, भारती मोरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.