दोडामार्ग : दोडामार्गात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी सभा सुरु आहे. दीपक केसरकर यांचं भाषण सुरु. ही निवडणूक आपलं कोण परकं कोण ही ठरवणारी आहे. काही केलं नाही म्हणणाऱ्यांनी दोडामार्गात येऊन पाहावं. केसरकरांनी यावेळी कुठल्या विकास कामासाठी किती निधी आणला याची यादीच सांगितली. ठेकेदारांना वठणीवर आणलं. पेंडिंग टेंडर भरायला लावली.
दोडामार्गात जेव्हा पूर आला होता, त्यावेळी सरकारसारखी मदतचं घरचा व्यक्ती समजून केली होती. त्याला प्रेम लागत. नुसतं येऊन बकरे कापले की प्रेम निर्माण होत नाही. पैसे वाटतात, आता इलेक्शन आहे म्हणून करता, इलेक्शन नव्हतं तेव्हा कुठे होता ? ज्या माणसाला टुडे आणि टुमारो मधला फरक कळत नाही तो आमदार होऊन काय करणार ? जमिनी लुटायच्या, दिल्लीला जाऊन पैसे आणायचे. पोलिसांकडून होणाऱ्या अटकेपासून वाचण्यासाठी आमदारकी नसते. आमदारकी ही लोकांची सेवा करण्यासाठी असते. म्हणून मी कुठेही असलो तरी तुमच्यासाठी पैसे पाठवत असतो. तुम्ही पेपर मध्ये वाचलं असेल, माझ्या मतदार संघामध्ये पहिलं 5 स्टार हॉटेल आरवलीला सुरु झालंय. पहिलं ताज ग्रुपच्या हॉटेलचं भूमिपूजन आरवलीला झालेलं आहे. तिलारीच अम्युजमेंट पार्कचं टेंडर ही निघालंय. 2 वर्ष लागली हे टेंडर पास करायला. तुम्हाला पत्रक पाठवतो. जे खोटं बोलतात ना त्यांची चिरफाड केलेली आहे. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की तुमचा आमदार राजधानीचा पालकमंत्री बनला. खोट्या प्रचाराला बळी पडू नका. मुख्यमंत्र्यानाही विनंती करणार आहे, राज्याची सेवा खूप केली आता कोकणातच राहायचं आहे. माझ्या कार्यालयालाही सांगितलंय आठवड्यातून दोन वेळा मतदारसंघातल्या माणसांशी बोलण्याची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोय करा.
राणेसाहेब हे कोकणच भूषण आहेत. वाद आमच्यात होते पण कुठे थांबायचं हे माहिती होत. मुंबईचे नेते येणार आणि आमच्याविषयी बोलणार एवढे आम्ही लहान नाही. आम्हाला स्वाभिमान आहे. दुसऱ्या वेळी सरकार स्थापन झालं त्यावेळी यांनी काँग्रेस सोबत हात मिळवणी केली. बाळासाहेबांचं तत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं. उद्धव साहेबांची आणि मोदी साहेबांची बैठक स्वतः घडवून आणली होती. त्यांनी कबूल केलं होतं की महायुती पुन्हा एकदा कोकणात स्थापन केली जाईल. आम्ही कधीच खोटं बोललं नाही. त्यांनी पंतप्रधांनाही फसवल. युती करुया म्हणून सांगितलं पण केली नाही. एकदा मंत्रीपदावरून काढलं पुन्हा तुमच्या हाताखाली काम करणार नाही. मलाही स्वाभिमान आहे. असा कोकणी माणूस असतो. हा कोकणी बाणा असतो. आम्ही कोणाच्या समोर झुकत नाही. खोके बीके काही घेत नाही. फक्त प्रेम घेतो. मी साई बाबांचा फक्त आहे. कधीही खोटं बोलत नाही. पुढच्या काळात दोडामार्गचा कायापालट झालेला असेल, असं वचन त्यांनी यावेळी दिलं.