दीपक केसरकर भाजपच्या वाटेवर : मायकल डिसोझा

Edited by: विनायक गांवस
Published on: September 27, 2024 11:45 AM
views 293  views

सावंतवाडी : महाराष्ट्रात फक्त सावंतवाडीत भाजप आणि शिवसेनेत सत्ता संघर्ष सुरू आहे. इतर मतदारसंघात तो दिसत नाही. दीपक केसरकर भाजपच्या वाटेवर असल्यानेच भाजपची मंडळी त्यांच्यावर तुटून पडली आहे‌. स्थानिक पदाधिकाऱ्यांना केसरकर भाजपात नको आहेत. त्यामुळेच ते केसरकरांवर तुटून पडलेत. तापलेल्या तव्यावर भाकरी भाजून घेण्याचा स्वभाव मंत्री केसरकर यांचा आहे. आता शिंदे गटातून निवडून येण शक्य नसल्याने ते भाजपच्या मार्गावर आहेत अस विधान उबाठा शिवसेनेचे संघटक मायकल डिसोझा यांनी केल. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, ज्यांच्यावर बॉडीगार्ड घेवून फीरतात, जमिनीचे व्यवहार करतात असे आरोप केसरकर यांनी केले होते. त्यांच्या कार्यक्रमाला ते काल हजर राहिले याचा अर्थ मतदारांनी नेमका काय काढायचा ? केसरकर यांनी निवडणूकीच्या तोंडावर मतदार संघात आणलेल्या एका उद्योगपतींनी स्थानिक मुलांना गंडा घातला आहे. त्यांचे पगार थकविले असताना त्यांचा पगार मिळवून देण्याबाबत केसरकर यांची भूमिका काय? हे त्यांनी जाहीर करावे असं आव्हान श्री डिसोजा यांनी देत. स्थानिक मुलांच्या झालेल्या आर्थिक फसवणूकीला केसरकर जबाबदार आहेत. त्यांनीच या उद्योगपतीला आणला होता. त्यामुळे त्या मुलांची जबाबदारी आता त्यांनी स्वीकारावी असे सांगितले. याप्रसंगी यावेळी शहरप्रमुख शैलैश गवंडळकर, अशोक परब, राजू शेटकर, संदिप गवस, फिलीप्स रॉड्रीक्स, समिर नाईक, प्रशांत बुगडे आदी उपस्थित होते