मंत्री दीपक केसरकर यांना बंटी पाटीलांचा टोला

Edited by: विनायक गावस
Published on: August 09, 2023 13:44 PM
views 330  views

सावंतवाडी : सावंतवाडीचे सुपुत्र दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत. मात्र, भाजपनेच पालकमंत्री बदलावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दीपक केसरकर हे कोल्हापूरला पर्यटनासाठी येत असल्याचं भाजपचं म्हणण आहे असा टोला कॉंग्रेस नेते आ‌. सतेज पाटील यांनी हाणला. कॉंग्रेस नेते, माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सावंतवाडीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक माजी राज्यमंत्री आ. सतेज पाटील यांनी घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, कॉंग्रेस तळागाळात जिवंत आहे. भाजपसारखी टीशर्ट आणि बिल्ले लावून फिरायची सवय आम्हाला नाही. कॉंग्रेस निवडणूकांची वाट पाहत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत. पण, भाजप निवडणूकांना घाबरत आहे. तर सावंतवाडीचे सुपुत्र दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत. मात्र, भाजपनेच पालकमंत्री बदलावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दीपक केसरकर हे कोल्हापूरला पर्यटनासाठी येत असल्याचं भाजपचं म्हणन आहे अस मत आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ज्येष्ठ नेते विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.