वेंगुर्ल्यात दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विकासकामांचा धडका सुरूच..!

वजराठ इथं विकासकामाचा शुभारंभ
Edited by: दिपेश परब
Published on: September 07, 2023 13:46 PM
views 214  views

वेंगुर्ला : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यात विकास कामांचा धडका सुरूच आहे. विविध गावात ठिकठिकाणी लाखो रुपयांचा निधी केसरकर यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी ६ सप्टेंबर रोजी तालुक्यातील वजराट चिरेखण कासलेवाडी सोन्सुरकरवाडी मार्गे होडावडा भटवाडी रस्त्यावर कॉक्रेटींग करणे या कामासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माद्यमातून मंजूर झालेल्या ५ लाख रुपये निधीच्या कामाचा शुभारंभ आज शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी वजराट सरपंच अनन्या आनंद पुराणिक, उपसरपंच प्रियांका साईप्रसाद केरकर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव परब, सामाजिक कार्यकर्ते अण्णा वजराटकर, ग्रा.प. सदस्य दीपिका राणे,  नम्रता देसाई, नामदेव कांदे, मनोहर परब, प्रेमानंद सावंत- भोसले, प्रताप राणे, साईप्रसाद केरकर, नितीन सावंत, अ.बा. परब, प्रवीण गावडे, बंटी सोनसुरकर, सुरेश कसले, चंद्रकांत कासले, संजय देसाई, दिपू सोनसुरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.