
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले नवरात्र उत्सव मंडळ म्हणून ओळखले जाणारे बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळाच्या उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी दीपक बाबाजी केसरकर तसेच खजिनदार शैलेश मेस्त्री, सेक्रेटरी दिलीप राऊळ, ईनास माडतीस यांची निवड करण्यात आली आहे. यंदा मंडळाचे ३४ वे वर्ष आहे. नवसाला पावणारी दुर्गामाता अशी या देवीची ओळख आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.भजन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, रेकॉर्ड डान्ससह विविध कार्यक्रमांची रेलचेल इथे नवरात्रीत असणार आहे. कुंकुमार्चन व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांसाठी पुरोहित बाळू कशाळीकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तर कार्यक्रमासाठी संपर्क शैलेश मेस्त्री 7498348044 यांच्याशी साधावा.