केसरकरांच्या आमदार निधीतून बांदा शहरासाठी कचरा गाडी !

साईप्रसाद काणेकर यांनी वेधलं होतं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: November 30, 2023 20:16 PM
views 93  views

सावंतवाडी : बांदा शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या बांदा ग्रामपंचायतीस कचरा उचलण्यास मर्यादा येत होती. त्यामुळे ग्रामपंचायतीसाठी कचरा गाडी मिळावी अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांना निधी मंजूर करण्यासाठी पत्र दिले होते.

स्थानिक आमदार विकास निधीतून १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून बांदा शहरासाठी कचरा गाडी उपलब्ध करून दिली आहे. या गाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याची सुविधा आहे. लवकरच या कचरा गाडीचे लोकार्पण करण्यात येणार आहे.