सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आमदार विकास निधीतून ५ लाख

मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
Edited by: विनायक गावस
Published on: November 21, 2023 14:34 PM
views 129  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला निधी मिळावा अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात आली होती. त्या अनुषंगाने स्थानिक आमदार विकास निधीतून ५ लाख रुपयांचा निधी दिला आहे.

या निधीतून रुग्णालयासाठी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांना यातून उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.