दीपक केसरकरांच्या हस्ते हायमास्टच लोकार्पण !

देव्या सुर्याजी यांचा यशस्वी पाठपुरावा
Edited by: विनायक गावस
Published on: November 11, 2023 21:26 PM
views 148  views

सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शहरातील सौर ऊर्जा हायमास्टच लोकार्पण करण्यात आल. माठेवाडा व जुनाबाजार परिसरात हे हायमास्ट बसविण्यात आल्यानं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर परिसरात लखलखाट पहायला मिळाला. याबद्दल मंत्री केसरकर यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.

शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून सुर्याजी घरासमोरील तिठ्यावर व  जुनाबाजार, होळीचा खुंट मैदान येथे सौर ऊर्जा हायमास्ट बसविण्यात आले‌‌. ५ लाख ६४ हजार रूपयांचे हे दोन हायमास्ट आहेत. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या विशेष प्रयत्नातून हे हायमास्ट बसविण्यात आले.


याप्रसंगी माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, बबलू मिशाळ, अनिल चिटणीस, प्रा. विकास गोवेकर, माजी सैनिक गणपत धुरी, किशोर चिटणीस, गुरूप्रसाद चिटणीस, राघवेंद्र चितारी, प्रतिक बांदेकर, मेहर पडते, डॉ. मुरली चव्हाण, अर्चित पोकळे, देवेश पडते, प्रथमेश प्रभू, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, सुजित कोरगावकर, नंदू गावडे, आबा चव्हाण, मंगिरीश रांगणेकर, अभिजीत कामत, संदीप धुरी, प्रशांत धुरी, साई केसरकर, नेल्सन फर्नांडिस, जितेंद्र सावंत आदि उपस्थित होते.