सावंतवाडी : मी यावेळी लोकसभेचा उमेदवार असणार असतो. नारायण राणे त्यावेळी इच्छुक नव्हते. मी लोकसभेला गेलो असतो तर विधानसभा राजन तेलींना मिळेल असं सांगितलं गेलं होतं. त्यामुळे ते इच्छुक होते. पण, भाजपच्या बैठकीत त्यांच्या कार्यकारिणीनं मला लोकसभेला विरोध करून विधानसभेचा आग्रह धरला असा गौप्यस्फोट शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला.
ते म्हणाले, सावंतवाडीचे 'मॅन ऑफ द मॅच' संजू परब आहेत तसेच वेंगुर्ल्याचे मनिष दळवी आहेत. मागच्यावेळी संजू परब आले असते तर आज तेच आमदार असते. मी यावेळी लोकसभेचा उमेदवार असणार असतो. नारायण राणे त्यावेळी इच्छुक नव्हते. मी लोकसभेला गेलो असतो तर विधानसभा तेलींना मिळेल असं सांगितलं गेलं होतं. पण, भाजपच्या बैठकीत मला लोकसभेला विरोध करून विधानसभेचा आग्रह धरला. राजन तेली हा मनुष्य भाजपला, शिवसेनेला मान्य नाही. त्यामुळेच उबाठाचे प्रमुख नेते प्रचारात दिसले नाहीत. या माणसाने हे समजून घेतले पाहिजे. मुलांना सुद्धा रात्रीचे बॅनर लावू नका म्हणून सांगितलं पाहिजे असा टोला केसरकरांनी हाणला.