
म्हापण : या भागातील जनतेशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या भागातील जनतेने सूचविलेली विकासकामे सर्रासपणे झालेली आहेत. आपल्या भागात परिपूर्ण विकास साधण्यासाठी तुम्हीच येत्या ८ दिवसांत घरोघरी जाऊन विकासकामांची महिती मतदारांना द्या. माझे सर्व काम जनतेसमोर आहे. त्यांना ते माहित आहे, म्हणूनच मतदारांचे माझ्यावरील प्रेम कधी कमी झालेले नाही. पूर्वी सुरू करण्यात आलेली चांदा ते बांदा योजना तसेच सध्या सुरू असलेल्या सिंधू रत्न योजनेतून आपल्या घरोघरी खऱ्या अर्थाने समृद्धी राबेल, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून भगिनींना आर्थिक हातभार लाभला आहे. आपण तीन वेळा मला आपली सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिलात त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मला संधी द्या. येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघासाठी वेळ देवून आपले काही अपुरे राहिलेली सर्व कार्य पूर्ण करण्याची करण्याचा प्रयत्न करणार असे प्रतिपादन सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी म्हापण येथे केले.
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय पक्षाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या म्हापण जिल्हा परिषद मतदार संघाचा गाव भेट दौऱ्याचा शुभारंभ श्री देव आदीनारायण मंदिर परुळे येथे श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी या दौऱ्याला मतदार संघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी पंचायत समिती सभापती निलेश सामंत, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, भोगवे माजी सरपंच महेश सामंत, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, विभाग प्रमुख देवदत्त साळगावकर, जि. प माजी सदस्य दादा कुबल, माजी शिक्षण व आरोग्य सभापती विकास गवंडे, शिवसेना उपजिल्हा संघटिका शितल साळगावकर, भोगवे सरपंच सौ.वायंगणकर, उपसरपंच रुपेश मुंडये, सोनाली केसरकर, महिला तालुका संघटक दिशा शेटकर, माजी पं.स.सदस्या वंदना किनळेकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, म्हापण उपसरपंच सुरेश ठाकूर, अवी देसाई, वसंत तांडेल, कोचरे सरपंच योगेश तेली, उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, माजी सरपंच विष्णु फणसेकर, माजी पं.स.सदस्य गौरवी मडवळ, म्हापण ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मडवळ, विलास राऊळ पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना केसरकर म्हणाले, काहीजण माझ्या वर टीका करण्याचे काम करत असून मी मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडून श्रेय घेतात तसेच काही लोक शेतकरी यांच्या सह्या घेऊन खोटी ॲफिडेव्हिड करुन जमिनी लाटत असून त्याचा मोबदला देखील देत नाहित. एक उमेदवार पुण्यात राहुन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे काम पाहणार का? असा प्रश्न करत त्यांनी विरोधकांना निशाणा केला.