वेर्लेच्या माजी सैनिक संघटनेचा दीपक केसरकरांना पाठिंबा

Edited by: विनायक गांवस
Published on: November 12, 2024 12:37 PM
views 184  views

सावंतवाडी : माजी सैनिक संघटना वेर्ले यांच्याकडून महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. श्री. केसरकर यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच राहीलोत.‌ यावेळी देखील आमचा पाठिंबा त्यांना आहे‌. सैनिकांची गाव ही त्यांच्यासोबत आहे असे प्रतिपादन यावेळी माजी सैनिकांकडून करण्यात आले. दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांना माजी सैनिकांनी हा पाठिंबा दिला. 


माजी सैनिक संघटना वेर्ले यांच्याकडून महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेण्यात आली. यावेळी केसरकर यांना माजी सैनिक संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला.‌ यावेळी श्री. केसरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण राऊळ, उपाध्यक्ष बाळकृष्ण लिंगवत, हनुमंत राणे, बाळकृष्ण राऊळ, शंकर राऊळ, सदाशिव राऊळ, महादेव राणे, अनंत कदम, रघुनाथ राऊळ, सचिन राऊळ, दिनकर बांदेकर, अनिल राऊळ, रामचंद्र मर्गज, कृष्णा वर्दम, वासुदेव राऊळ, चंद्रशेखर पारधी, प्रमोद राऊळ आदी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.