केसरकरांच्या विजयाचा निर्धार !

प्रभाग ५ मध्ये महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक
Edited by: विनायक गांवस
Published on: November 07, 2024 13:59 PM
views 132  views

सावंतवाडी : शहरातील  प्रभाग पाच मधून जास्तीत जास्त मताधिक्य महायुतीला मिळण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार आज महायुतीच्या बैठकीत करण्यात आला. भाजप व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठकीत दीपक केसरकर यांना विजयी करण्याचा निश्चय केला. 

यावेळी बैठकीत प्रचाराची रणनीती आखली असून महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा जोरदार झंजावत सुरू करण्यात आला आहे. यावेळी 'दीपकभाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा जोरदार घोषणा देखील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडीत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर विजयी होईल असा दावा उपस्थितांनी केला. 

यावेळी महायुतीचे मंदार नार्वेकर, सुधीर आडीवरेकर, अँड. संजू शिरोडकर, संतोष गांवस, देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, परिक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, अनिकेत पाटणकर, गणेश कुडव, नागेश जगताप, गुरुप्रसाद चिटणीस, परेश बांदेकर, वर्धन पोकळे, प्रथमेश प्रभू, संकल्प धारगळकर, मंथन जाधव आदी उपस्थित होते.