
सावंतवाडी : जीवनात यशस्वी होण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर समोर ठेवून चाला. कोणीतरी पैसे देऊन मत विकत घेवू पहात असेल तर त्याला थारा देऊ नका. अमिषाला बळी पडू नका. सर्वसामान्यांसाठी योजना आणणार हीत करणार महायुतीचे सरकार पुन्हा आणण्यासाठी कामाला लागा असे आवाहन महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांनी केले. येथील महायुतीच्या दलित समाज मेळाव्यात ते बोलत होते.
ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा अन् संघर्ष करा अशी शिकवण दिली. त्या तत्त्वानुसार आम्ही चलतो. लोकशाहीच महत्व पटवून देताना आमिषाला बळी पडू नका असं सांगितलं आहे. त्याच पालन करत महायुती सरकार ज्याने विविध योजना सर्वसामान्यांना दिल्या त्यांच्या मागे उभे रहा असं आवाहन श्री. केसरकर यांनी केलं. डॉ. आंबेडकर व पुण्यश्लोक बापूसाहेब यांचा न्यायनिवाड्याचा सावंतवाडीतील किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.
तसेच जर्मनीमध्ये चांगली संधी आपल्या मुलांना आहे. कौशल्यप्रधान मुलांना तिथे संधी आहे. ती संधी साधा, कोणताही व्यवसाय करण्यात कमीपणा बाळगू नका. फायदा होणारा कोणताही व्यवसाय तुम्ही करावा. त्यासाठी शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे अस त्यांनी सांगितले. केवळ राजकारणात एकत्र न येता समाज म्हणून एक राहणं आवश्यक आहे. आपल्या मुलांना शिक्षण देणं व रोजगार, व्यवसायासाठी प्रेरणा द्यावी. सावंतवाडीच समाजमंदिर माझ्या संकल्पनेतून साकारल आहे. त्यावेळी आमच्या वस्त्यात रस्ता, पाणी, वीज घराघरात पोहचवली. रचनाबद्ध कारभार केला. येत्या २६ नोव्हेंबरच्या संविधान यात्रेत पुन्हा आमदार व मंत्री म्हणून मी सहभागी होणार आहे त्यासाठी तुमचा आशीर्वाद द्या असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले. सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीचा दलित समाज मेळावा वैश्य भवन येथे पार पडला. यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,माजी सभापती अंकुश जाधव, भाजपचे चंद्रकांत जाधव, गुंडू जाधव, गुरू कासले, राजन कांबळे, हर्षदा जाधाव, तानाजी कुणकेरकर, सोनीया मठकर, अर्चना जाधव, लाडू जाधव आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.