
सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानाबाहेर लिंबू आढळून आलं आहे. निवडणूक कालावधीत सावंतवाडीत याआधी असेच लिंबूटिंबूचे प्रकार घडताना दिसून आले होते. त्यात आज महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर लिंबू टाकलेलं आढळुन आले आहे. त्यामुळे या लिंबावरून उलटसुलट चर्चांना पेव फुटला आहे.