सावंतवाडी : झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यानंतर शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली असून रमेश बैस यांच्या जागी सीपी राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने सदिच्छा भेट घेत मंत्री केसरकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.