दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्षपदी दीपक गवस

Edited by:
Published on: April 21, 2025 15:15 PM
views 448  views

दोडामार्ग : दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्षपदी दीपक गवस यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक पक्ष निरीक्षक महेश सारंग व मंदार कल्याणकर यांनी या नावाची घोषणा केली. निवडी नंतर बोलताना नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष म्हणाले, भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढविण्यासाठी मेहनत घेऊन तालुक्यातील प्रत्येक घराघरात भाजपचा झेंडा लावण्याचे काम करीन, शत प्रतिशत भाजपासाठी आपले प्रयत्न असल्याचे गवस यांनी सांगितले. 

भाजप तालुकाध्यक्ष निवड भापच संपर्क कार्यालय येथे पक्ष निरीक्षक महेश सारंग व मंदार कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख विजयकुमार मराठे, माजी जि.प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक संतोष नानचे, शहर प्रमुख राजेश फुलारी, चंदू मळीक, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पराशर सावंत, वैभव इनामदार, संजय सातार्डेकर, समीर रेडकर, सुधीर पनवेलकर, आनंद तळणकर, कानू दळवी, महिला तालुकाध्यक्ष दिक्षा महालकर, नगरसेविका संध्या प्रसादी, आकांक्षा शेटकर, देवेंद्र शेटकर, सुनील गवस, सुमित म्हाडगूत, संतोष नाईक, अजय दळवी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा सरचिटणीस महेश सारंग म्हणाले की भारतीय जनता पार्टी व सर्व प्रदेश च्या सुचने नुसार दोडामार्ग तालुका मंडळ अध्यक्ष पदी दीपक गवस यांची नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष दोडामार्ग मध्ये प्राथमिक सदस्य असलेला मोठा पक्ष आहे आपण  जवळपास 13 हजार प्राथमिक सदस्य नोंदणी आपल्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. दोडामार्गचा विकासाच्या दृष्टीने आपले खासदार नारायन राणे, पालकमंत्री नितेश राणे, रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून दोडामार्ग चा विकास करण्यासाठी प्रयत्न करू. माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी या निवडी वेळी उपस्थित नसल्या बाबत महेश सारंग यांना विचारणा केली असता ते म्हणाले नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी ते गेले आहे. ते कोणत्याही प्रकारे नाराज नाही. भाजपचे सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व एकत्र आहेत. आणि एकत्र राहून काम करणार आणि सर्वानूमते दीपक गवस यांच नाव पक्षाने जाहीर केल आहे. त्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी नाही.