विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 26, 2025 19:46 PM
views 261  views

कणकवली : तळेरे येथील दुर्गा देवेंद्र खटावकर (२९) यांच्या आत्महत्येप्रकरणी पती देवेंद्र रंजन खटावकर (३५, रा. तळलेले) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद दुर्गा यांचा भाऊ अक्षय संतोष मुळे (३२, बेळगाव) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. दुर्गा यांनी गुरुवारी सकाळच्या सुमारास राहत्या घराकडे आत्महत्या केली होती. याबाबत पती देवेंद्र याने दिलेल्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मात्रष दुर्गा यांचा भाऊ अक्षय यांनी देवेंद्र हा दुर्गा यांना शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. त्याच त्रासाला कंटाळून दुर्गा यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार देवेंद्र याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे करत आहेत.‌