मांगेलीत कॉलेज युवतीची आत्महत्या

कारण गुलदस्त्यात | पोलिसांसमोर तपासाचं आव्हान
Edited by: लवू परब
Published on: November 11, 2025 13:13 PM
views 585  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मांगेली फणसवाडी येथील कु. समीक्षा सुनिल गवस ( १८ ) हिने सोमवारी सायंकाळी उशिरा घरात छप्पराच्या लोखंडी राॅडला साडीने गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. तिच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. काॅलेज मधून घरी जातात तीने हे अचानक टोकाचे पाऊल का? उचलले तिला कुणाचा फोन आला होता. त्यामुळे तीने तडफातडफी हा निर्णय घेतला. दोडामार्ग पोलीसासमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान आहे. 

दोडामार्ग पोलिसांनी राञी मांगेली फणसवाडी येथे जाऊन पाहणी केली. याबाबत तीचे काका उमेश रामा गवस यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात खबर दिली. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. कुमारी समीक्षा गवस ही भेडशी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर काॅलेज मध्ये बारावी मध्ये शिक्षण घेत होती. सोमवारी ती काॅलेज मध्ये आली होती. सायंकाळी घरी जाते वेळी तिला कुणाचा फोन आला होता तेव्हा ती तणावाखाली होती अशी चर्चा साटेली भेडशी मध्ये सुरू होती. तेव्हा पोलिसांनी मोबाईल डिटेल्स तपासणी करणे आवश्यक आहे. 

दोडामार्ग पोलीस कर्मचारी यांनी आवश्यक पंचनामा करून काही जणांचे जाब जबाब नोंदवले आहे. दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.