
कणकवली : कणकवली येथे दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या रोहन रोहीदास म्हाडेश्वर (४५, रा. जानवली, सापळेबाग) यांचे उपचारादरम्यान शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी पहाटे मृत्यू झाला. रोहन म्हाडेश्वर यांचे बेळणे येथे 'बेल' हॉटेल आहे. रोहन म्हाडेश्वर यांच्या पश्चात त्यांचे वडील, मुलगा आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.
रोहन महाडेश्वर है २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकातून गांगोमंदिरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरून जात होते. अभ्युदय बँकेसमोर त्यांचा गाडीवरून स्वतःहून तोल गेला आणि ते खाली पडले. अपघातस्थळी पोहचलेल्या मिथुन ठाणेकर यांनी रोहन महाडेश्वर यांना अपघाताबाडाल विचारले असता, त्यांनी 'मी गाडीवरून तोल गेल्याने पडलो असे सांगितले. अपघातात जखमी झालेल्या रोहन यांना उपचारासाठी जाण्यास सांगितले असता, त्यांनी घरी सोडण्यास सांगितले. त्यामुळे ठाणेकर यांनी त्यांना घरी नेऊन सोडले.
अपघातानंतर रोहन म्हाडेश्वर कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, शुक्रबार ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वा च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची पोलिसांत नोंद करण्यात आली होती.










