
देवगड : देवगड तळेबाजार साईनगर येथील विश्वनाथ सहदेव रुमडे वय (८४) यांचे शनिवार दिनांक ६ सप्टेंबर रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी आकस्मित निधन झाले. एक प्रसन्न चित्त व्यक्ती व शांत स्वभाव अशी त्यांची ओळख होती त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.










