विश्राम कुबल यांचं आकस्मिक निधन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 07, 2025 15:00 PM
views 229  views

देवगड :  मत्स्यव्यवसाय खात्यातील माजी कर्तव्यदक्ष अधिकारी, तसेच तांबळडेग गावचे जेष्ठ नागरिक विश्राम बापू तथा आबा कुबल यांचे आज पहाटे देवगड येथील खासगी रुग्णालयात उपचार दरम्यान दुःखद निधन झाले. ते मुत्युसमयी ८५ वर्षाचे होते. पांच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करून ते डोंबिवली येथे परतीच्या प्रवासाला निघणार होते. तथापि त्यांना अचानक त्रास जाणवला म्हणून  त्यांना देवगड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथं त्यांनी तिथंच अखेरचा श्वास घेतला.  त्यांची प्रकृती ठणठणीत होती.  त्यांच्या आकस्मिक निधनामुळे दुःख व्यक्त करण्यात येत असून ते गावच्या सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात  सक्रीय सहभाग घेत असतं. त्यांनी कित्येक मच्छीमार बांधवांना शासकीय मत्स्यव्यवसाय खात्याकडून मदत मिळवून देण्यास  सहकार्य केले होते.

त्यांचा लोभसवाणा होता तसेच ते परोपकारी वृत्ती होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी , सूना, पुतणे, दोन भाऊ, विवाहित बहीणी असा परिवार आहे. त्यांच्यावर तांबळडेग येथील सागरतिर्थावर अंत्य संस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.