वैभववाडी : सध्या वैभववाडी बेळेकरवाडीतील किसन हुताप्पा पवार (वय३०) याच आज दुपारी आकस्मिक निधन झाले. त्याची पत्नी अनिता पवार हिने याबाबत पोलीसात माहिती दिली. कर्नाटक विजापूर येथील राहणारे पवार कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून वैभववाडीतील बेळेकरवाडी येथे वास्तव्यास आहे. इमारत बांधकामासह इतर कामांसाठी हे दांपत्य मजूरीच काम करत असत.आज आठवडा बाजारानिमित्त त्यांच्या कामाला सुट्टी होती. त्यामुळे किसन हा घरातच होता. सकाळी जेवण आटोपल्यानंतर तो झोपी गेला. त्यानंतर दुपारी ३.३०च्या दरम्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याच्या पत्नीने त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.