
कुडाळ : डिगस रूमडगाळू येथील इंद्रजीत जयवंत सावंत वय (५५) यांचे आज मंगळवारी कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुलगे, चार विवाहित बहिणी असा परिवार आहे.
इंद्रजीत सावंत हे इंद्रायणी प्रसारक शिक्षण मंडळ कै. पुष्पसेन सावंत ज्ञानपीठ कॉलेज वाडी हुमरमळा या कॉलेजवर ते संचालक पदावर कार्यरत होते. इंद्रजीत सावंत यांचा स्वभाव मनमिळावू असा होता. माजी आमदार कै. पुष्पसेन सावंत यांचे ते पुतणे होत तर पुष्पसेन ज्ञानपीठ कॉलेजचे अध्यक्ष भूपतसेन यांचा व माजी जि. प. सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांचे ते चुलत भाऊ होत. त्यांच्या अकाली निधनाने डिगस गावावर शोककळा पसरली आहे.