
सावंतवाडी : सबनीसवाडा येथील रहिवासी तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच माजी मुख्याध्यापक व माजी क्रिकेटपटू, कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चिंतामणी तोरस्कर (वय 80) यांचे आज अल्पशा आजाराने कोलगाव या ठिकाणी निधन झाले.
मच्छीमार नेते रविकिरण तोरस्कर, सामाजिक कार्यकर्ते निशु तोरस्कर यांचे ते वडील होते. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या सबनीसवाडा या निवासस्थानी दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तीन वाजता अंत्ययात्रा सबनीसवाडा या त्यांच्या निवासस्थानाकडून निघेल. उपरल स्मशानभुमीत त्यांच्या वर अंतिम संस्कार होणार आहेत.