फिट येऊन पडल्याने युवकाचा मृत्यू..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 24, 2023 11:08 AM
views 687  views

देवगड : उजव्या पायाने अपंग असलेल्या साळशी कुळयाचीवाडी येथील रूपेश शशिकांत साटम (वय - ४२) या युवकाचा फिट येवून पडल्याने बुधवारी दुपारी १२.३० वा. सुमारास साळशी पावणाई मंदीरासमाेर मृत्यु झाला. याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रूपेश हा बुधवारी दुपारी घरातून आपण गावात जावून येताे असे सांगून गेला.दुपारी १२.३० वा.सुमारास साळशी पावणाई मंदीरासमाेर फिट येवू पडून त्याचा मृत्यु झाला.

याबाबतची खबर त्याचे वडील शशिकांत नारायण साटम यांनी देवगड पाेलिस स्थानकात दिली असून पाेलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणून नाेंद केली आहे. तपास पाेलिस नाईक महेंद्र महाडिक करीत आहेत.