
देवगड : देवगड तालुक्यातील फणसे खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेलेल्या इसमाचा खाडीत बुडून मृत्य झाला आहे. जयसिंग सहदेव गावकर असे या मृत्यूमुखी झालेल्या इसमाचे नाव आहे. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांन कडून मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे देवगड़ तालुक्यातील फणसे येथील जयसिंग सहदेव गावकर (५६ रा फणसे) हे फणसेकर खाजनासमोरील खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला.
याबाबतची माहिती त्यांचे भाऊ दिनेश गावकर यांनी देवगड पोलिसात दिली. या घटनेचा अधिक तपास देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय बिर्जे करत आहेत.