
कुडाळ : काँग्रेसचे आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते मुंबई माझगाव संतमित्र गोविंदराव परब चौकातील मराठा क्लाँथ स्टोअरचे मालक वैकुंठ गोविंद परब ( वय ७३) यांचे मुंबई भायखळा येथे नुकतेच निधन झाले. ते मूळ कुडाळ तालुक्यातील बांबुळी गावचे रहिवासी आहेत. बांबुळी भूषण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. परोपकारी वृत्ती हा त्यांचा स्वभाव होता. सिंधुदुर्ग जिल्हा युथ फेडरेशनचे संस्थापक (कै. वाय्.डी. सावंत, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या समवेत त्यांनी सहकारी म्हणून काम केले होते.










